दूधगंगा डावा कालव्यातील पाणी पूजन

दूधगंगा डावा कालव्यातील पाणी पूजन

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील दिंडनेर्ली येथून जाणाऱ्या दूधगंगा डावा कालव्यातील पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी, परिसरातील माता-भिगीनींनी गारवा आणत पाण्याचे पूजन केले.

दूधगंगा डावा कालवा हा एकूण ७६ कि.मी. लांबीचा आहे. या प्रकल्पाद्वारे राधानगरी, करवीर, कागल, भुदरगड, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यातील गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे कालव्यामुळे 1600 हेक्तर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

या कालव्यामुळे चुये, कावणे, निगवे खालसा, इस्पूर्ली गावातील शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येत असून आता दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव गावांतील शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध होणार असून यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे.
परंतु, पाण्याचा अतिवापर आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढत आहे, हे टाळायचं असेल तर पाण्याचा आणि रासायनिक खतांचा वापर नियोजन बद्ध करायला हवा. कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावेत.

नोकरी ऐवजी प्रगतशील शेतीकडे तरुणानी वळणे गरजेचे आहे. शिवाय लोकसंख्या वाढत असली तरी जमिनीचे क्षेत्र आहे तितकेच राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सामुदायिक शेतीचा विचार करणे सुद्धा गरजेचं आहे.