‘मातृ देवो भव’ ही विचारधारा असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांवरील अत्याचाराच्या घटना अत्यंत लाजिरवाण्या आहेत. महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यसरकार अत्यंत सवेंदनशील असून राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
आज मा. गृहमंत्री अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली व विधिमंडळातील आमच्या महिला लोकप्रतिनिधी तसेच गृह विभागातील अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये दिशा कायदा आणि राज्यातील महिला सुरक्षितता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या “दिशा” कायद्याच्या अनुषंगाने लवकरच नवा कायदा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे.