डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संकटकाळात कोरोना तपासणी क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. याच अनुषंगाने आज डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, कदमवाडी, कोल्हापूर येथे ‘कोरोना’ तपासणी लॅब सुरु करण्यात आली आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा बोर्ड, भारत सरकार (एन.ए.बी.एल) यांच्या मान्यतेनुसार, व संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही लॅब सुरु करण्यात आली आहे. यामुळे, कोल्हापूरमध्ये संशयित रुग्णांची तपासणी व उपचार तात्काळ करण्यास मदत होणार आहे.

यावेळी, कोल्हापूरमध्ये संशयित रुग्णांची तपासणी व उपचार लवकर करण्यास मदत होणार आहे. यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, केम्पी पाटील, कुलगुरू राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपी शर्मा, अधिष्ठाता डॉ. गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email