डिजिटल सभासद नोंदणी अभियान

डिजिटल सभासद नोंदणी अभियान

आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाबाबत व जिल्ह्यातील संघनात्मक कामकाजाबाबत तालुकानिहाय सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
दिवसभरामध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ, हातकंणगले, गगनबावडा, इचलकरंजी शहर, भुदरगड, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. अनेक लाटा येतील आणि जातील. मात्र, काँग्रेस हा गोरगरीबांच्या व सर्वसामान्यांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. तो वाढविण्यासाठी सर्वांनी राज्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
तो वाढविण्यासाठी सर्वांनी राज्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरुणांना काँग्रेसमध्ये मोठी संधी असून सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा. कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागळापर्यंत पक्षाचे काम आणि ध्येय धोरणे पोहचवावीत, असे आवाहन यावेळी केले.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email