भारतीय मध्य रेल्वेच्या मिरज जंक्शन ते छ. शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर या रेल्वेमार्गामुळे रूईकर कॉलनीकडून विक्रमनगरकडे जाण्यासाठी उचगांवच्या दिशेने वळसा मारून यावे लागायचे. विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरात मोठी रहिवासी वस्ती असल्याने बऱ्याचवेळा रुईकर कॉलनी मधील रहिवासी टेंबलाईवाडी येथे जाणेसाठी शेतकरी पेट्रोल पंप ते लोहार वसाहत रोड येथील मारुती मंदिर जवळुन सदरचा रेल्वेमार्ग पायी जीव धोक्यात घालून ओलांडत असतात.
सदरची, हि परिस्थिती लक्ष्यात घेता शेतकरी पेट्रोल पंप ते लोहार वसाहत रोड येथील मारुती मंदिर जवळ उड्डाणपूल हा अनिवार्य होता.
त्यामुळे, या उड्डाणपुलासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडून जवळपास 80 लाख रुपये मंजूर करून दिले.
तसेच, हा लोखंडी पादचारी उड्डाणपुलाची एकूण लांबी ३०.०० मी. असून रुंदी ३.४० मी आणि एकूण उंची ३.२० मी. असून त्याचे वजन २८.०० मे. टन इतके आहे.