झी कोल्हापूर सन्मान पुरस्कार

झी कोल्हापूर सन्मान पुरस्कार

आज कोल्हापूरच्या कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान करणाऱ्या झी चोवीस तास वाहिनीच्या ‘झी कोल्हापूर सन्मान पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी, जेष्ठ नेते प्रा.डॉ. एन.डी.पाटील साहेब यांना ‘झी कोल्हापूर जीवनगौरव सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

तसेच, कोल्हापूरचे नाव जगभरात पोहचविणाऱ्या रत्नांचा सन्मान करणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. या कार्यक्रमात पुरस्कार मिळालेल्या सर्वांचेच अभिनंदन! आम्हाला तुमचा सदैव अभिमान आहे.

यावेळी, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सतीश पत्की, डॉ अमित आसनकर, डॉ. सुरज पवार, बांधकाम क्षेत्रातील अजयसिंह देसाई, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई पोळ, अनिल माने आणि शारंगधर देशमुख, उद्योजक क्षेत्रासाठी बापूसाहेब जाधव, उद्योजक गणेश एकबोटे, उद्योजक शंकर पाटील आदी मान्यवरांना गौरविण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याला, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ अभिनव देशमुख, संपादक आशिष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email