आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ, कोल्हापूर चे नाव गेली ६० वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे करणारे, आयुका चे संस्थापक , ऋषितुल्य , पदमविभूषण डॉ. जयंत नारळीकर सरांची भेट घेण्याचे भाग्य लाभले. त्यांना #ब्रँड_कोल्हापूर या उपक्रमाची माहिती दिली. हा वेगळा उपक्रम त्यांना मनापासून आवडल्याचे त्यांनी सांगितले. ते कोल्हापूरचे सुपुत्र असल्याने ब्रँड_कोल्हापुर मोठा करण्यासाठी भविष्यात राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांना त्यांचे मार्गदर्शन व पाठबळ असावे अशी विनंती त्यांना केली. विज्ञान व तंत्रज्ञानातील बदलांबाबत ही त्यांच्याशी व त्यांच्या पत्नी गणिततज्ञ सौ. मंगला नारळीकर यांच्याशी चर्चा झाली. सरांनी दिलेल्या आशीर्वादामुळे कोल्हापूरसाठी चांगले काम करत राहण्यासाठी नवी ऊर्जा व बळ मिळाले.