उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास व पंचायत राज अभियान, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण मेळाव्याचे उद्घाटन आज झाले. यावेळी, जिल्ह्यातून आलेल्या हजारो महिलांशी यावेळी संवाद साधला.
यावेळी, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, महिला व बाल विकास मंत्री ना. यशोमती ठाकूर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आ. ऋतुराज पाटील, आ. राजूबाबा आवळे, श्रीमती उदयानी साळुखे, आ. चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती सौ. पद्मारानी पाटील, स्वाती सासणे, हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व त्यांचे सर्व सहकारी आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या महिला उपस्थित होत्या.