छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्या राज्यातील पहिल्या उपकेंद्राचा शुभारंभ

छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्या राज्यातील पहिल्या उपकेंद्राचा शुभारंभ

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ संस्थेच्या राज्यातील पहिल्या उपकेंद्राचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार होते.

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात हे उपकेंद्र सुरु करण्यात येणार असून आज या उपकेंद्राच्या कार्यालयाची व जागेची पाहणी करून आवश्यक सूचना प्रशासनाला दिल्या.

खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेच्या राज्यातील या पहिल्या उपकेंद्राचे स्वप्न साकार होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे.