चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिर परिसराला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा

चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिर परिसराला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा

दक्खनचा राजा श्री जोतिबा देवाची ‘चैत्र यात्रा’ गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे झालेली नाही. मात्र यंदा १६ एप्रिल रोजी होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जोतिबा मंदिर परिसराला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला.
१. यंदाच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असून भावनिकांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत. तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. एसटी व्यवस्था, पाणी व्यवस्था, शौचालय व्यवस्था तसेच सीसीटीव्ही व्यवस्था आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
२. यात्रेसाठी कार्यरत असणारे मंदीर व्यवस्थापन, स्टॉलधारक, संबंधित कर्मचारी, ठेकेदार या सर्वांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असतील.
३. या यात्रेस खाद्य पदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या स्टॉलधारकांनी अन्न औषध प्रशासन विभागाची परवानगी आवश्यक असेल.
४. भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाची तसेच भाविकांसाठी मंदिरात येण्या-जाण्याच्या मार्गाची पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.
५. जोतिबा डोंगरावर यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविक महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून येतात. यंदा अधिकचे 30 टक्के भाविक जोतिबा यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी केल्या.
६. तसेच, भाविकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.