घरचे आपुलकीचे कौतुक

घरचे आपुलकीचे कौतुक

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कसबा बावडा येथे माझा जन्म झाला, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात बावड्यातील लोकांचे ऋण खूप मोठे आहेत. आमच्या कुटुंबियांवर केलेले प्रेम खरोखरच फार मोलाचे आहे. माझ्या सर्व सुख-दुःखात सर्व बावडेकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, म्हणून आज मी या पदावर पोहचू शकलो.

आज समस्त बावडेकरांनी माझा सत्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते केला. शाहू महाराजांचे आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शन माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नेहमीच प्रेरणा देणारे आहेत. मला घडविण्यात बावडेकरांचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही. आज हा घरगुती सत्कार केल्याबद्दल मी आयोजक आणि समस्त बावडेकरांचे मनापासून आभार मानतो.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email