गोकुळ संघाने गायीच्या दूध खरेदी दरातील कपात मागे घ्यावी, यासाठी ‘गोकुळ’ व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले आहे.
अमूल ने कोल्हापुरातून पळ काढण्याचे कारण गोकुळचे व्यावहारिक वर्चस्व नसून, भाजप गटातील संचालकांचा राजनैतिक लग्गा आहे …
संघाचा दूध खरेदी आणि विक्रीतील फरक 20 रुपयांचा आहे. ही रक्कम जाते कुठे?
दर कमी करण्यामागे कोणाचा हात आहे हे जिल्ह्याला माहीत आहे. संचालक पोटतिडकीने बाजू मांडत असतांना हेच प्रश्न जेव्हा सर्वसाधारण सभेत विचारले होते, तेव्हा का उत्तरे दिली नाहीत?
दूध संस्थांतून संघाला येणार्या दुधाची फॅट व संघाची फॅट यामध्ये फरक असून संघात फॅटचा घोटाळा चालू आहे.
सत्ताधारी संचालक मंडळाच्या भ्रष्ट करभारामुळे गोकुळ दूध संघाचे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.