गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट’ या संस्थेचा रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट’ या संस्थेचा रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ

माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याच्या उदात्त हेतूने त्यांचे पुत्र मा. पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट’ या संस्थेचा रौप्यमहोत्सवी सांगता समारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा. शरद पवारजी व माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मा. मल्लिकार्जुन खर्गेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी, स्व. डॉ. पतंगराव कदम खुले सभागृह व स्व. संयोगिता पाटील केंब्रीज स्कूलचे नामकरण करण्यात आले.

यावेळी, माजी राज्यपाल मा. खा. श्रीनिवास पाटीलजी, आ. पृथ्वीराज चव्हाणजी, महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटीलजी, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. शंभूराजे देसाई, सहकार व कृषीराज्यमंत्री ना. विश्वजीत कदम, आ. मोहनशेठ कदम, शरद पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. विक्रम सावंत, सदाशिवराव पाटील, वीरकुमार पाटील, काकासो पाटील, संजय बजाज तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

– *ना. सतेज (बंटी) डी. पाटील*

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email