खिळेमुक्त_झाडांचं_कोल्हापूर

खिळेमुक्त_झाडांचं_कोल्हापूर

‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देत असतानाच आहे ती झाड जगवणे महत्वाचे ठरते, झाडांना देखील संवेदना असतात हे आपण विसरून अनेक ठिकणी झाडांवर खिळे, फलक, तारा, अँगल, लोखंडी ब्रॅकेट मारले जातात. यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन “खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहीम राबविण्याची संकल्पना शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या समोर मांडली आणि त्याला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आज शहरातील ५० हुन अधिक स्वयंसेवी संस्था तसेच संस्थांबरोबरच पाचशे हुन अधिक वृक्ष प्रेमी कोल्हापूरकरांनी वैयक्तिकपणे ठिकठिकाणी या मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला यासर्वांनी ही मोहीम यशस्वी केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
मोहिमेत सहभागी सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी कटवानी, पक्कड, शिडी यांच्या साहाय्याने झाडांवरील खिळे काढले. अनेक ठिकाणी एका झाडावर तीस ते चाळीस खिळे असल्याचे आढळले. काही झाडावर असलेले लोखंडी ब्रॅकेट, साखळ्या काढण्यासाठी गॅस कटरचा सुद्धा वापर करण्यात आला. बरीच वर्षे झाडांमध्ये रुतून बसलेले खिळे तसेच करकचून बांधण्यात आलेलया तारा काढल्यामुळे या झाडांनी मोकळा श्वास घेतला.
पण इतक्यात आपली जबाबदारी संपली नाही. इथून पुढे कोल्हापुरातील झाडांवर कोणी खिळे मारणारच नाही याची आपण सर्वांनी मिळून जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
कायद्यानुसार झाडांना इजा पोहचविणे, त्याच्यावर खिळे मारणे अशा प्रकारचे कृत्य गुन्हा ठरत असल्याने, यापुढे झाडावर खिळे मारणे अथवा बोर्ड लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या संदर्भातील सूचना कोल्हापूर महानगरपालिकेला दिले आहेत. पर्यावरणाची होत असलेली हानी आणि येणाऱ्या काळात वृक्ष संपदेची गरज लक्षात घेता, केवळ कोल्हापुरापूर्ती ही मोहीम मर्यादित न राहता राज्यभर अशा प्रकारची मोहीम लोकांनी घ्यावी.
आज या मोहिमेमधून काही भाग राहिला असेल, काही झाडांवर खिळे दिसले तर आपण सर्वांनी ही खिळे काढून झाडांना खिळेमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही विनंती.
वृक्षारोपण जशी काळाची गरज आहे तशीच वृक्ष संवर्धन सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. चला सर्वजण मिळून कोल्हापूरला ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ बनवूया!
या मोहिमेमध्ये , रोटरी क्लब ऑफ करवीर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, शहर युवक काँग्रेस रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, निसर्ग मित्र, मैत्रेय प्रतिष्ठान, व्हाईट आर्मी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, रोटरी क्लब ऑफ शिरोली एम.आय.डी., रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईझ, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इजि. एन.एस.एस विभाग, एनएसयूआय, कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ गार्गिज, सुमन साळवी व बाल विकास संस्था, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर ट्रॅव्हल एजंटस् असो., जिल्हा युवक काँग्रेस, कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ हॉरीझोन, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, कोल्हापूर, राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ, जायंन्ट्स ग्रुप मैत्री फौंडेशन, कोल्हापूर आर्ट फौंडेशन, विज्ञान प्रबोधिनी, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज एन.एस.एस विभाग, रोट्रॅक्ट क्लब, क्षेत्रीय फाउंडेशन यांच्या सह पन्नासहुन अधिक स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. या सर्व सहभागी संस्थांचे व जबाबदार नागरिकांचे मनापासून आभार!.