कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि सर्किट बेंच व्हावे यासाठी माननीय विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर जी यांच्या पुढाकाराने आज माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या समवेत विधानभवन येथे बैठक संपन्न झाली.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूर खंडपीठ आणि सर्किट बेंचसाठी आपली सकारात्मकता दर्शवली असून याबाबतचे पत्र आज उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना पाठविण्याची ग्वाही दिली.