कोल्हापूर शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

कोल्हापूर शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णापैकी पन्नास टक्के रुग्ण हे या एकट्या कोल्हापूर शहरातील आहेत. त्यामुळे शहरातील यंत्रणा वेळेवर कार्यान्वित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी एकावेळी २२०० रुग्ण पॉझिटिव्ह येतील याअनुषंगाने सर्व सुविधांचे नियोजन करण्यात आले होते, यंदा मात्र एकावेळी दिवसात ३३०० रुग्ण पॉझिटिव्ह आले तरी यंत्रणा कुठेही तोकडी पडणार नाही, असे नियोजन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले आहे.
तसेच शहरातील आयसोलेशन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट हा येत्या २० दिवसात उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर महागरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सध्या ४४० ऑक्सिजनेटेड बेड हे महापालिकेच्या यंत्रणेतील उपलब्ध आहेत तर खासगी रुग्णालयातील ६२५ ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातील एकूण उपलब्ध व्हेंटीलेटरपैकी सध्या पन्नास टक्के व्हेंटिलेटर शिल्लक आहेत. हे शिल्लक व्हेंटिलेटर वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना आहे.
कोल्हापूर* शहरात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर दिल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत* आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेले लोक पॉझिटिव्ह येत असून त्यांची योग्य व्यवस्था केली जात आहे. प्रशासन कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर आणि बाधित सापडणाऱ्या रुग्णाची व्यवस्था करण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही.
आजपासून कोल्हापूर शहरात बॅरेंगेटिंग करून रुग्ण संख्या जास्त असलेल्या भागामध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासन कोरोनाचे हे संकट थोपविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील दक्ष राहून सहकार्य करण्याची गरज आहे.
संचारबंदीच्या काळात प्रशासनाने दोन दिवस नागरिकांना सहकार्याची भावना ठेवली. मात्र अनेकजण गरज नसताना बाहेर फिरत असल्याने अशा लोकांवर वाहन जप्तीची कारवाई अटळ आहे. त्यामुळे, माझी कोल्हापूरकरांना कळकळीची विनंती आहे, राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email