कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंगमधील अडथळ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट

कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंगमधील अडथळ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट

कोल्हापूर विमानतळावर होणाऱ्या मोठ्या विमानांच्या नाईट लँडिंगमध्ये काही अडथळे येत आहेत. या अडथळ्यांबाबत दोन दिवसांपूर्वी खासदार संजय मंडलिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अडथळ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याचं नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन अडथळ्यांची पाहणी केली.
या अडथळ्यांमध्ये लाईटचे पोल, झाडे, उंच इमारती, पाण्याची टाकी, जाहिरातींचे बोर्ड तसंच मोबाईल टॉवर यांचा समावेश आहे. यापैकी लाईटचे पोल झाडे तसंच जाहिरातींचे बोर्ड हे अडथळे हटवणं तत्काळ शक्य असल्यानं ते त्वरित हटवावेत अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर शाहू टोल नाका इथल्या वैभव हाऊसिंग सोसायटी टेकडावर वसलेली असल्यानं इथल्या घरांसह इलेक्ट्रिक पोल, मोबाईल टॉवरचा अडथळा निर्माण झाल्यानं, इथल्या मिळकत धारकांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत विमान प्राधिकरणाच्या सर्व्हे टीमला परत एकदा बोलावून त्यांच्याशी प्रत्यक्ष अडथळ्यांच्या ठिकाणी पुन्हा एकदा भेट देऊन चर्चा करून या अडथळ्यांबाबत इतर काही मार्ग काढता येईल का याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email