कोल्हापूर विमानतळासंदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठक

कोल्हापूर विमानतळासंदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठक

आज कोल्हापूर विमानतळासंदर्भामध्ये मा. जिल्हाधिकारी दौलत देसाई, विमान प्राधिकरण, महावितरण, महसूल, सार्वजनिक बांधकाम आदी अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेणेत आली.

आजच्या या बैठकीमध्ये खालील बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१. विमान प्राधिकरणकडून विमानतळ टर्मिनल बिल्डिंग तसेच इतर कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

२. विमानतळाच्या विकासात्मक कामामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी मार्गी लावण्यासंदर्भात, शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावाबाबत तसेच नवीन भूसंपादन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

३. कोल्हापूर विमानतळाच्या विकासात्मक कामाकरिता १५ दिवसांतून एकदा बैठक घेऊन विमानतळाच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, विमानतळ प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर सतीश गुप्ता, अनंत शेखर, पूजा मुल, महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर म्हारूळकर आदी अधिकारी उपस्थित होते.

– *आमदार सतेज (बंटी) डी. पाटील*

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email