कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसंदर्भात विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसंदर्भात विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगदरम्यान येणारे अडथळे काढण्याच्या दृष्टीने, आज खासदार संजय मंडलिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कोल्हापूर विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमान मार्गात पॉवर ग्रीड टॉवरचा मोठा अडथळा असल्याचे विमान प्राधिकरणाच म्हणणे आहे. त्यानूसार प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत आज प्रत्यक्ष पॉवर ग्रिडला भेट देवून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सद्यस्थितीत अडथळा ठरणारे पॉवर ग्रीडचे टॉवर हटवणे अशक्य आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून मुडशिंगी गावाच्याच्या बाजूने विमानांचे नाईट लँडिंग करता येईल का?,याचा विचार करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर पॉवर ग्रीडच्या टॉवरवर 2 ब्लींकर लाईट त्वरित बसवाव्यात अशाही सुचना दिल्या.
तसेच विमानांना मुडशिंगी गावाच्या बाजूने नाईट लँडिग करण शक्य होत असल्यास त्या मार्गात असणारा अतिउच्च दाबाच्या लाईटचा टॉवर काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 48 लाखांची तरतूद केली जाणार आहे.
यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कमलकुमार कटारिया, पॉवर ग्रीडचे हिमांशू रावत, मुख्य प्रबंधक व्ही एन प्रसाद प्रांताधिकारी वैभव नावडकर, करवीर तहसिलदार शितल मुळे-भांबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email