कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.

नुकताच कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे, विस्तारीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. तसेच, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट आणि वीजपुरवठा आदी कामे वेळेत पूर्ण करण्याचा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email