कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील सर्व विकास कामांचा आढावा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील सर्व विकास कामांचा आढावा

आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील सर्व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी, शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचे सध्या परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी, खालील मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
१. कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या थेट पाइपलाईन पाणी योजनेच्या कामांची गती कोरोनाच्या संकटामुळे संथ झाली होती. पण आता, या योजनेच्या प्रलंबित कामाला वन विभागाची परवानगी मिळाल्याने काम लवकर पूर्ण होईल. आतापर्यंत या योजनेचे 53 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे असून सोळांकूर मधील 1800 मीटरचे काम प्रलंबित आहे. तरी सोळांकूरच्या ग्रामस्थांशी बोलून यातून लवकरच सकारात्मक मार्ग काढण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रिशियनचे काम तीस टक्के बाकी आहे तेही लवकरच पूर्ण केले जात आहे. तसेच, जॅकवेल आणि राफ्टचे काम पूर्ण झाले असून फेब्रुवारीमध्ये काळम्मावाडी धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे प्रलंबित काम हे लवकर पूर्ण करून एप्रिल 2021अखेर ही योजना कार्यान्वित होईल.
२. कोल्हापूर शहरातील अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून एकूण 211 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. यामधील शहरातील 12 पाण्याच्या टाक्यांपैकी 8 पाण्याच्या टाक्यांचे काम सुरु असून लवकरच उर्वरित टाक्यांचे कामही पूर्ण होईल. त्यामुले सदर योजनेचेही काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
३. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी ई-गव्हर्नर्सवर भर देऊन घरफाळा, पाणीपट्टी तसेच नागरिकांसाठी तक्रार निवारण्यासाठी मोबाईल अप्लिकेशन व वेबसाईटचे काम सुरु असून लवकरच ते ही कार्यन्वित करण्यात येणार आहे.
४. आयटी पार्क संदर्भातील ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या पूर्ण करून जमिनीचा विषय मार्गी लागल्यावर एका महिन्याभरात टेंडर काढण्यात येईल आणि हा विषय मार्गी लावण्यात येईल.
५. कोल्हापूर शहरांमध्ये सुमारे 40 ते 45 कोटींची विकासकामे सुरू आहेत ही विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
६. सोबतच 80 कोटी रुपयांचा करवीर निवासनी अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात पार्किंगचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील कामांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email