कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आज जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटलला भेट देऊन सज्जतेसाठी आवश्यक त्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या.
तसेच, खालील काही महत्त्वाचे निर्णय ३१ मार्च पर्यंत लागू करण्यात येणार आहे.
१. परदेशातून आलेल्या प्रत्येकाने स्वतःहून सीपीआरमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, तसेच पुढील १४ दिवस योग्य काळजी घेऊन घरीच राहावे.
२. कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा/महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद राहतील पण शिक्षक व स्टाफ यांनी आपल्याला शाळा/महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे.
३. गर्दी होईल असे कोणतेही खाजगी/सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये.
४. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या घरोघरी जाऊन कोरोना विषाणू बद्दल जनजागृती करणार आहेत.
५. मॉल/ चित्रपट गृहे/ जलतरण तलाव/ व्यायामशाळा/ म्युझियम / वॉटरपार्क इ. गर्दीचे ठिकाणे बंद राहतील.