कोल्हापूर जिल्ह्यातील ८०० सरपंच यांच्यासोबत आढावा बैठक

कोल्हापूर जिल्ह्यातील ८०० सरपंच यांच्यासोबत आढावा बैठक

केंद्र व राज्यशासनाच्या आदेशानुसार कोरोनामुळे इतर जिल्ह्यांमध्ये/राज्यांमध्ये अडकून असलेल्या कोल्हापूरकरांना आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येता येणार आहे.

परंतू, यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी आज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री, खासदार, आमदार,महापौर, जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त,जिल्हा पोलीस प्रमुख,जिल्हा परिषद सीईओ,नगराध्यक्ष,नगरसेवक आणि जिल्ह्यातील ८०० सरपंच यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी, बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे योग्य नियोजन करण्यासंदर्भात या सर्वांच्या सूचना समजावून घेतल्या व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांची माहिती सांगितली. तसेच खालील सूचना केल्या.

✅१.बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवेश पास व ज्या ठिकाणांहून आले तेथील डॉक्टरांचे सर्टिफिकेट याची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर २० ठिकाणे निश्चित केली आहेत. तसेच, या नागरिकांची जिल्ह्यामध्ये प्रवेश देताना या ठिकाणी असलेल्या आरोग्य कर्मचारी पथकाकडून तपासणी होणार आहे
ही सुविधा २४ तास उपलब्ध असेल. पोलीस, आरोग्य तपासणी पथक तसेच येणारे नागरीक यांच्यासाठी या सर्व ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहेत.

✅ २.बाहेरून येणाऱ्या या व्यक्तींना संथात्मक विलगीकरण किंवा घरी विलगीकरण करण्याचा संपूर्ण अधिकार हा ग्राम/प्रभाग समित्यांना असेल.

✅ ३. बाहेरून आलेले लोक कोणाच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घेणे, सोशल डिस्टंसिग पाळणे तसेच, सर्वांनी मास्क वापरावे या कडे लक्ष देणे याबाबत प्रभाग समिती आणि ग्राम समितीने जबाबदारी घ्यावी.
गेली चाळीसहून अधिक दिवस जिल्ह्यातील जनतेने कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे. पुढील १५ ते २० दिवस अजूनही महत्वाचे असल्याने सर्वांनी त्यापद्धतीने काळजी घ्यावी असे आवाहन केले.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email