कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेबाबत आढावा बैठक

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेबाबत आढावा बैठक

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
गेल्या काही दिवसांपासून देशासह, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर कोल्हापूरमध्ये रुग्नांची संख्या जरी कमी असली तरी सद्यस्थितीत आणि एप्रिलअखेर संभाव्य रुग्णसंख्या गृहित धरून नियोजन करण्याच्या सूचना मागील बैठकीमध्ये दिल्या होत्या.
मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेवून या वर्षीही कोरोना रुग्णांसाठी तयारी ठेवावी. महानगरपालिका, आय जी एम, सी.पी.आर आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय यंत्रणा पूर्ण क्षमतेने उपचारासाठी कार्यान्वित करावे सोबतच, प्रत्येक विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पडण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, उपायुक्त निखील मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, के एम ए च्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email