कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राची पाहणी

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राची पाहणी

आज कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राची पाहणी केली. यावेळी, चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
यावेळी, नुकसान झालेल्या भातशेती तसेच ऊस पिकांचे संपूर्ण पंचनामे येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच, पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा. वादळीवारे,अतिवृष्टीमुळे शेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
किणी, कोवाड येथील भात पिकाचे नुकसान झालेल्या रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेच्या शेत पिकाचे नुकसान पाहून त्यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच, शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा दिला.
३० ऑक्टोबर पर्यंत चंदगड सोबतच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल.
यावेळी. आम.राजेश पाटील, जि.प.सदस्य विलास पाटील, कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, सचिन बल्लाळ, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई काँग्रेस तालुका अध्यक्ष, विक्रम पाटील, जे.के.पाटील, माजी सभापती पं.स.गडहिंग्लज विजय पाटील, संतोष मळविकर, तानाजी गडकरी, आरबोले सोमगोंड, अभिषेक दुंडगेशिंपी, मारुती भोगन, जनार्दन देसाई, अंजना रेडेकर, महादेव वांद्रे, अभिजित गुरबे, अशोक बाळ, किरण कांबळे, विष्णु अढाव, तसेच संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email