कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक

आज कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी, आगामी २०२१-२२ या वर्षासाठीच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून चालू वर्षाच्या व कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झालेल्या खर्चाचा आढावा घेतला.
यावेळी, काही महत्वाच्या नाविन्यपूर्ण योजनांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये, राज्यात प्रथमच आपत्ती व्यवस्थापनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी एकत्रित पूर्वसूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली उभारण्यात येणार आहे. तसेच, वळिवडे ता. करवीर येथील पोलंड वासीय वास्तूचे संग्रालय उभारणे, शिवाजी विद्यापीठ हायवे कँटीन ते डीओटी पर्यंत सायकल ट्रॅक, प्रशासकीय कामांना वेग देण्यासाठी तहसील स्तरावर व्हीसी रूम तयार करणे, जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना डीबीटी मधून थेट आर्थिक मदत देण्यात येणार. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत जनजीवन पूर्वपदावर येत असताना या संकटामुळे प्रलंबित कामे अधिक जोमाने आणि तत्परतेने करण्यावर भर देण्यात येणार असून जिल्हयातील आरोग्य सुविधा सुद्धा अधिक सक्षम करण्यावर आमचा जोर आहे.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबवून कोल्हापूरचा विकास करण्यासंदर्भात यावेळी सर्वांगीण चर्चा झाली असून सर्वच लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोल्हापूरला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.