#ब्रँड_कोल्हापूर
कोल्हापूरचा अभिनंदन पाटील स्टार्ट अप हिरो ऑफ द स्टेट.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचा अभिनंदन पाटील याने दुधाच्या भूकटीपासून विकसित केलेली कर्करोग प्रतिबंध पावडर राज्यातील सर्वोकृष्ट स्टार्टअप ठरला आहे.
अभिनंदनला व्हिएनआयटी, नागपूर मध्ये एक लाखाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अभिनंदनने पाच वर्षे आपल्या प्रयोगासाठी मेहनत घेतली होती. आतड्याच्या कर्करोगाला रोखण्यासाठी दुधाच्या भुकटीमध्ये विशिष्ट जिवाणूंचा समावेश आहे. या जिवाणूंचा शोधही त्याने स्वतः लावला आहे. या भूकटीच्या सेवनाने कर्करोगासहीत सर्दी, खोकला आणि विविध इन्फेक्शनपासून बचाव होतो.
केवळ शारीरिक आजार नव्हे तर या प्रयोगाने शेतकऱ्यांना डेअरीसोबत नवा व्यवसाय करण्यासाठीही मदत मिळू शकते.
या संकल्पनेचे पेटंट फाईल करण्यासाठी प्रक्रिया अभिनंदनने सुरू केली आहे.
त्याचबरोबर दीपक सावंत याना इन्स्टंट टी .बी .टेस्टिंग सेन्सर साठी “इनोव्हेशन इन हेल्थ केअर साठी पहिला तर प्रियांका पाटील यांना हिलींग ड्रेसिंग मटेरियल साठी हेल्थकेअर इन इनोव्हेशन साठी दुसरा पुरस्कार मिळाला आहे .
हे तीन संशोधक डी .वाय .पाटील विद्यापीठ कोल्हापूर मध्ये रिसर्च स्कॉलर आहेत .
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रोत्साहन देणारे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, ट्रस्टी ऋतुराज पाटील, कुलगुरु डॉ. प्रकाश बेहेरे ,प्र-कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, रजिस्ट्रार डॉ .विश्वनाथ भोसले, डीन आर. के. शर्मा आणि विशेष म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणारे डॉ .एस. एच.पवार , डॉ .सी.डी.लोखंडे यांचे अभिनंदन .
या सर्वांच्या पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.