कोल्हापूर जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, एन. एस. यु. आय. आणि युथ काँग्रेस यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील सरकारी, खाजगी रुग्णालयात सुमारे 2 हजार नवजात बालकांसाठी ‘बेबी किट’चे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरामध्ये काँग्रेस पक्षाकडून सामान्य नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिह्यातील या नवजात बालकांना बेबी किटचे वाटप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घरपोच करण्यात येणार आहे.