आज #कोल्हापूर_कला_महोत्सव ची दिमाखात सुरवात झाली.
आज पासून सुरु झालेल्या या उत्सवाचे उदघाटन कला दिग्दर्शक मा. नितीन देसाई यांच्या शुभहस्ते झाले.
नितीनजींनी कोल्हापूरच्या कलाकारांच्या कलाकृती जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन आज दिले. तसेच
कला महोत्सवातील कलाकृतींचे कर्जतच्या एन.डी.स्टुडिओ मध्ये प्रदर्शन होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
एका हाडाच्या कलाकारलाच खरी कलेची किंमत कळते असे म्हणतात त्याचा प्रत्यक्षात साक्षात्कार आज नितीनजींना भेटून झाला.
पुढील पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये, आपणही सहभागी होऊन कोल्हापुरातील कलाकारांच्या उत्कृष्ट कलेचा आस्वाद घ्याव आणि कलाकृती विकत घेऊन कलाकारांना पाठबळ द्या हि विनंती.