कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत मा. एन. डी. पाटील साहेब यांच्या निवासस्थानी आयोजित बैठक

कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत मा. एन. डी. पाटील साहेब यांच्या निवासस्थानी आयोजित बैठक

कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत मा. एन. डी. पाटील साहेब यांच्या निवासस्थानी खा. संजय मंडलिक, आ. चंद्रकांत जाधव, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी, शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत खालील गोष्टी तात्काळ करण्याचे नियोजन केले आहे.

१. खा. संजय मंडलिक, खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदार फंडातून आणि आ. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या आमदार फंडातून प्रत्येकी पंचवीस लाख (२५ लक्ष), एकूण ७५ लक्ष रुपये देण्यात येणार आहे.

२. तसेच, नवनियुक्त आमदारांचे फंड उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ त्यांच्या आमदार फंडातून निधी यासाठी वापरण्यात येणार आहे.

३. महापुराच्या काळात खराब झालेल्या रस्त्यांसाठी तात्कालीन राज्य सरकारकडून कोणतीही मदत करण्यात आली नाही, त्यामुळे याबाबत राज्यपालांनी लवकरात लवकर लक्ष घालून तात्काळ मदत उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.

४. शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी १ कोटी ६२ लाख रुपयांचे काम सध्या सुरु आहे. तसेच, शहरातंर्गत प्रमुख रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय नगरोत्यान निधी मिळावा यासाठी, १७० कोटी प्रस्थावासाठी पाठपुरवठा करण्यात येणार आहे.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email