आज कोल्हापुरातील सानेगुरुजी प्रभागातील विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या या संकटामुळे काही काळ शहरातील विकास कामे करता येत नव्हती. करवीर निवासासनी आई अंबाबाईच्या कृपेने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु, जोपर्यंत यावर लस येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, भिकाजी गावकर, बाबुराव भुरके, कुंडलिक साखळकर, हणमंत गणबावले, रंगराव ताटे, विनायक फाळके, किरण पाटील, मधुकर रामाने, सुवर्णा महादेव मोरे, माया तगारे, संध्या क्षीरसागर, उर्मिला सोनूर्लेकर, हेमंत जाधव, महेश सासणे, हिंदुराव पाटील, सुरेश सुर्वे, डी. डी पाटील, दिलीप कोंडेकर तसेच भागातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.