कोल्हापुरातील लाईन बाझार येथील झूम प्रकल्पाची पाहणी

कोल्हापुरातील लाईन बाझार येथील झूम प्रकल्पाची पाहणी

आज कोल्हापुरातील लाईन बाझार येथील झूम प्रकल्पाची पाहणी करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, या प्रकल्पाच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, पत्रे बसविणे आदी विविध कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याचबरोबर, या झूम प्रकल्पाशेजारी असलेल्या देवार्डे मळा, अष्टेकर कॉलनीसह इतर भागात नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी, यावेळी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, महिला बाल कल्याण सभापती शोभा कवाळे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, शारंगधर देशमुख, सुभाष बुचडे, मोहन सालपे, प्रा. अशोक जाधव, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह मनपा पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email