कोल्हापुरातील रोटरी मुव्हमेंट व क्रीडाई यांनी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल मध्ये उभारण्यात आलेल्या कोविड-19 केंद्राचे आज लोकार्पण

कोल्हापुरातील रोटरी मुव्हमेंट व क्रीडाई यांनी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल मध्ये उभारण्यात आलेल्या कोविड-19 केंद्राचे आज लोकार्पण

कोल्हापुरातील रोटरी मुव्हमेंट व क्रीडाई यांनी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल मध्ये उभारण्यात आलेल्या कोविड-19 केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. रोटरी आणि क्रीडाई या दोन्ही संस्थांनी नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे.

कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर कोल्हापुरातील या दोन्ही संस्थांना गरज पडल्यास व्हेंटिलेटर आणि बेड्चे नियोजन करून ठेवण्याचे आवाहन मी केले होते. एकूण पाचशे अडतीस बेडची नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी आज महासैनिक दरबार येथे 125 बेडची सुविधा देण्यात आली आहे. येत्या काळात ग्रामीण भागात कायमस्वरुपी सुविधा उभी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना या दोन्ही संस्थांना करण्यात आल्या आहेत.

यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर तसेच रोटरीचे माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक, प्रकाश जगदाळे, एस. एस. पाटील, उत्कर्षा पाटील, एम. वाय. पाटील, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email