कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्क संदर्भामध्ये बैठक

कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्क संदर्भामध्ये बैठक

कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्क संदर्भामध्ये आज महानगरपालिका आणि कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.
कोल्हापुरात आयटी पार्कच्या उभारणीसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून यासंदर्भामधील कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिकेला सूचित करण्यात आले आहे.
नियोजित आयटी पार्कमध्ये चांगल्या आयटी कंपन्या कशा येतील यासाठी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. आयटी पार्कच्या उभारणीमुळे कोल्हापुरात रोजगार निर्मिती चांगल्या प्रकारे होणार असून कोल्हापुरातील युवक-युवतींना याचा लाभ होणार आहे.
त्याअनुषंगाने ज्या कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याकरिता पायाभूत सुविधा आणि सर्व सोई उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली असून संबंधितांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच यामध्ये स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील अनेक तरुणांना रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यात आणि परराज्यात जावे लागते. मात्र कोल्हापुरात, आय टी क्षेत्रांतील तरुणांना नोकऱ्या निर्माण झाल्यास, कोल्हापुरातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने लवकरच हे आयटी पार्क उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
आर्थिक व्यवहार्यता रिपोर्ट तयार करणे व त्याप्रमाणे निविदा प्रक्रिया करणे या अनुषंगीक तांत्रिक, आर्थिक व कायदेशीर प्रक्रिया करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या 24 जून रोजी या संदर्भात पुढील बैठक घेवून, नियोजित आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, कोल्हापूर आयटी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रसन्न कुलकर्णी, प्रताप पाटील, विश्वजीत देसाई, स्नेहल बियाणी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Yogesh Gaidhane and 878 others
38 Comments
10 Shares
Like

Comment
Share
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email