कोल्हापुरातील कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठक

कोल्हापुरातील कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना, लसीकरण, रेमडीसीव्हीर, प्राणवायू प्रकल्प आणि लॉकडाऊनबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला.
काल रात्रीपासून कोल्हापूरमध्ये जाहीर केलेल्या लॉकडाऊनला कोल्हापूरकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. मला खात्री आहे, आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपण सर्व कोल्हापूरकर मिळून या संकटावर नक्की लवकरच मात करू.
कोल्हापूर प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडीसीव्हीर वाटप कोणत्या रुग्णांना केले याची सविस्तर माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. त्यामध्ये ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचे नाव,संपर्क क्रमांकासह माहितीचा समावेश असावा,असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यासोबतच, जिल्ह्यातील रेमडीसीव्हीरचा पुरवठा, प्राणवायूची सध्यस्थिती, पीएसए ऑक्सीजन जनरेटर प्रकल्प याबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये १४ ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्पांचे काम सुरु असून ते अधिक गतिमान करून लवकरात लवकर ते पूर्णत्वास नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चर प्रणित पुणे प्लॉटफॉर्म कोव्हिड रिस्पॉन्सच्या मिशन प्राणवायू प्रकल्पाव्दारे कोल्हापूरसाठी 50 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. याचसोबत, अजून २० ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर लवकरच प्रशासनाला प्राप्त होतील.
यातील चंदगडसाठी 10, राधानगरीसाठी 10, संजय घोडावत विद्यापीठ रुग्णालयासाठी 20 आणि इचलकरंजी येथील आयजीएम येथील रुग्णालयासाठी 10 देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सी.पी.आरसाठी 4 आणि महापालिका रुग्णालयासाठी 1 बायपॅकही दिले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, आदी उपस्थित होते.

 

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email