कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम सणाबद्दल जिल्हास्तरीय शांतता कमिटीची पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम सणाबद्दल जिल्हास्तरीय शांतता कमिटीची पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम सणाबद्दल जिल्हास्तरीय शांतता कमिटीची पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव तसेच मोहरम सण साध्या पद्धतीने, विदुयत रोषणाई, देखावे टाळून, मुख्यतः आगमन आणि विसर्जन मिरवणूक टाळून सोशल डिस्टंसिंग, मास्क व शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळून साजरा करण्याची विनंती सर्व मंडळाना केली. तसेच, गणेशोत्सव आणि मोहरम सणावेळी होणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवून सार्वजनिक मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, अशीही विनंती यावेळी केली. या आवाहनाला सर्वच तरुण मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, खा. धैर्यशील माने, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव, जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अप्पर पोलिस अधिक्षक तिरूपती काकडे, सौ. अलका स्वामी, नगराध्यक्षा इचलकरंजी, संजय पवार, राजू लाटकर, दुर्गेश लिंग्रज, आर. के. पवार, गणी आजरेकर, कादर मलबारी, शहाजी कांबळे, शिवाजी व्यास, जयसिंगपूर नगराध्यक्षा डॉ. नीता माने, गडहिंग्लज नगराध्यक्षा श्रीमती स्वाती कोरी, अमर समर्थ, जिल्हयातील सर्व शांतता, मोहल्ला समितीचे शहर आणि जिल्हयातील सार्वजनिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email