काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी स्थलांतरित मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस कमिटी उचलावे अशी घोषणा केली होती. काँग्रेसच्या या निर्णयाला अजून बळ देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने राज्यातील स्थलांतरित मजुरांचा प्रवास खर्च उचलण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.
लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडकलेल्या १ हजार ६६ स्थलांतरित मजुरांना आज कोल्हापूर ते जबलपूर (मध्य प्रदेश) या विशेष रेल्वेने रवाना करण्यात आले. यावेळी, या सर्व मजुरांचा खाण्या-पिण्याचा खर्च कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आला आहे. या सर्व श्रमिकांची यात्रा सुखद होवो हीच मनोकामना.
यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, महापौर सौ. निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. संध्या घोटणे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.