कसबा बावड्यातील पॅव्हेलियन हॉल येथील सुसज्ज कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

कसबा बावड्यातील पॅव्हेलियन हॉल येथील सुसज्ज कोव्हीड सेंटरचे लोकार्पण

आज कसबा बावड्यातील पॅव्हेलियन हॉल येथे कोल्हापूर महानगरपालिका संचलित नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुसज्ज कोव्हीड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
या सेंटर मध्ये 45 ऑक्सीजन बेड, 1 हाय फ्लो ऑक्सिजन बेड व 4 नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले असून, रूग्णांना लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी आपण सर्वजण शर्तीचे प्रयत्न करत आहोत. यापुढे जिल्ह्यात एकही कोरोना सेंटर उभे करावे लागू नये हीच सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे.पण, कोरोना विषाणूंवर लस उपलब्ध होईपर्यंत सर्वांनीच योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
याप्रसंगी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, रोटरी गव्हर्नर संग्राम पाटील, सूर्यकांत पाटील, बुद्धीहाळकर, श्रीकांत झेंडे, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे व संचालक, नगरसेवक सुभाष बुचडे, डॉक्टर संदीप नेजदार, मोहन सालपे, अशोक जाधव, श्रावण फडतारे, माधुरी लाड, स्वाती यवलुजे यांच्यासह कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी, कसबा बावड्यातील डॉक्टर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
– ना. सतेज (बंटी) डी. पाटील
    पालकमंत्री, कोल्हापूर
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email