उदयपूर येथील राष्ट्रीय व शिर्डी येथील राज्यस्तरीय नवसंकल्प कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर कराड येथे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित एकदिवसीय ‘नवसंकल्प कार्यशाळेला उपस्थित राहून जिल्ह्यातून आलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
या कार्यशाळेत उदयपूर आणि शिर्डी येथे संपन्न झालेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबजावणी, राजकीय व सामाजिक विषय तसेच काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत मंथन करण्यात येणार आहे.
१३७ वर्ष जुन्या असणाऱ्या काँग्रेस पक्षाने कायम देशहिताचा विचार केला आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जात असताना काँग्रेस पक्षाची भविष्यकालीन रूपरेषा ठरवण्याचे काम राष्ट्रीय व राज्यपातळीवर करण्यात आले असून हे धोरण जिल्हास्तरावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीयांना एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष कायमच आघाडीवर राहिला आहे. परंतु, गेल्या ८ वर्षांपासून ध्रुवीकरणाचे राजकारण करत समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या या ‘भारत तोडो’ला काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर देणे गरजचे आहे.
फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे, पुढे घेऊन जाणारा आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी ‘पुन्हा एकदा काँग्रेस’चा जो नारा दिला आहे तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी आपण सर्वानी मिळवून एकत्रित काम करणे गरजेचे आहे.
यावेळी, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब, ना. डॉ. विश्वजीत कदम, मा. डॉ. रावसाहेब कसबे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षडॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.