एसटी महामंडळाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

एसटी महामंडळाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

एसटी महामंडळाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्याने एसटीसाठी सर्वोतोपरी आर्थिक मदत करण्याची ग्वाही मा. अजित पवारजी यांनी यावेळी दिली.
याबैठकीमध्ये, कोरोना काळातील एसटीची कामगिरी, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारा निधी व एसटीचे उत्पन्न वाढीच्या उपयोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
या अडचणीच्या वेळी रा.प. महामंडळाला मिळलेल्या या आर्थिक मदतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पुढील पगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी, महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरातजी, परिवहन मंत्री अनिल परबजी यांचे मनापासून आभार.
कोरोनाच्या या संकटातून सावरून पुन्हा एसटी राज्यातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी पूर्ववत होत आहे. लवकरच एसटीच्या अन्य सर्व समस्यांवरही तोडगा काढला जाईल.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email