‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीबाबत (UDCPR) कोल्हापूर क्रिडाईच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीबाबत (UDCPR) कोल्हापूर क्रिडाईच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रासाठी नुकताच मंजुरी देण्यात आलेल्या ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीबाबत (UDCPR) कोल्हापूर क्रिडाईच्यावतीने आज कोल्हापूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजिन करण्यात आले होते.
राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये बांधकाम क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे, परंतु बांधकाम करताना विकासकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे संपूर्ण राज्यात बांधकामाबाबत एकसमान नियमावली असावी अशी मागणी होत होती.
त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर वगळता संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’ला डिसेंबर 2020 पासून मंजुरी देण्याचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.यामुळे राज्यातील बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.
तसेच सरकारच्या ‘झोपटपट्टीमुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला सुद्धा यामुळे चालना मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अबाधीत ठेवून ही नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचा सर्वात जास्त फायदा 150 चौरस मिटरपर्यंत बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
अशा प्रकारची एक अभ्यासपूर्ण व सुसूत्रित नियमावलीला मंजुरी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी, मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातजी, मा. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मा. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मी मनापासून आभार मानतो.
या नवीन नियमांवलींबाबतचे मार्गदर्शन आणि शंकांचे निरसन करण्यासाठी कोल्हापूर क्रिडाईच्यावतीने आज कोल्हापुरात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा कार्यशाळेचे आयोजन करणारा कोल्हापूर हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.
यावेळी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, टाऊन प्लॅनिंगचे जाईंट डायरेक्टर प्रकाश भुकटे, सुनिल माळी, अविनाश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.