इचलकरंजी येथील IGM रूग्णालयाला भेट देत आढावा बैठक

इचलकरंजी येथील IGM रूग्णालयाला भेट देत आढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज इचलकरंजी येथील IGM रूग्णालयाला भेट देत आढावा बैठक घेऊन ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिंटमेंट या त्रिसुत्रानुसार ‘अर्ली ट्रेसिंग आणि अर्ली ट्रिंटमेंटवर’ भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी, आवश्यकतेनुसार कोविड काळजी केंद्र वाढवावेत, शक्यतो सभागृह घेवून सुविधा निर्माण कराव्यात. तसेच, प्रातांधिकाऱ्यांनी इचलकरंजी व परिसरातील खासगी डॉक्टरांसोबत बैठक घेवून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याच्या सूचना यावेळी केल्या.
सोबतच, संभाव्य रूग्णसंख्या लक्षात घेवून तयारी ठेवावी आणि आवश्यक ते नियोजन करून कंत्राटी पध्दतीने आवश्यक ते कर्मचारी घेण्यात यावेत. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर रोखण्याबाबत सर्वांनीच योग्य पावले उचलावीत, अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
या पाहणी दौऱ्यादरम्यान, व्यंकटेश्वरा हायस्कूल मधील कोविड काळजी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, जि.प.सदस्य राहुल आवाडे, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, अतिरिक्त पोलिस प्रमुख जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक मदन कारंडे, संजय कांबळे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, वैद्यकीय अधिकारी रवींद्र शेट्ये, डॉ. महेश महाडिक, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email