इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास (आयजीएम) भेट घेऊन रुग्णालयातील आवश्यक सुविधांबाबत आढावा

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास (आयजीएम) भेट घेऊन रुग्णालयातील आवश्यक सुविधांबाबत आढावा

गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास (आयजीएम) भेट घेऊन रुग्णालयातील आवश्यक सुविधांबाबत आढावा घेतला.

आयजीएम सोबतच शहरातील काही लॉज कोविड सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात येणार असून त्यांची जबाबदारी ही स्थानिक डॉक्टर किंवा हॉस्पिटल यांच्यावर सोपवली जाणार आहे.

प्रशासन जिल्ह्यातील कोरोना संकटाशी सक्षमपणे सामना करत आहे. परंतु, नागरिकांनी संयम बाळगून स्वतः सह कुटुंबाची काळजी घ्यावी. मास्क हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक समजूनच काही महिने वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे, एखाद्याला लक्षणे आढळून आल्यास तातडीने उपचार घ्यावेत. आपण काळजी घेतली तर निश्चितपणे कोरोनावर मात करू शकतो.

याप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, अशोकराव स्वामी, नगरसेवक शशांक बावचकर, संजय कांबळे, शहाजी भोसले आदींसह अधिकारी उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email