आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उदघाटन

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उदघाटन

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
गेल्या महिन्यात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळाले. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि ते सोडविण्यासाठी अविरत काम करणाऱ्या प्रा. जयंत आसगावकर यांना पुणे शिक्षक विभागातील शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेमध्ये पाठविले. गेल्या एक महिन्याभरामध्ये त्यांनी केलेले काम आणि प्रलंबित प्रश्नांचा केलेला पाठपुरवठा कौतुकास्पद आहे. या मतदारसंघातील पाच जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनींना त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व शिक्षकांना सोयीचे होईल अश्या मध्यवर्ती ठिकाणी आपले जनसंर्पक कार्यालय सुरु केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
या उदघाटन प्रसंगी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, श्रीमंत. मालोजीराजे छत्रपती, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, के.पी. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, गुलाबराव घोरपडे, शुभांगीताई गावडे, धैर्यशील पाटील, वसंतरावदादा देशमुख, एस.डी.लाडसर, विजयसिंह मोरे, अशोक पाटील, सुनील पवार, सुभाष सातपुते तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email