कोल्हापूर जिल्ह्याला एक असा सैनिकी इतिहास आहे. त्यामुळेच, आज आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोल्हापूर शहर व कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील साळोखे नगर येथे आयोजित केला होता.
यावेळी, आजी माजी सैनिकांच्या माता, भगिनी पत्नी,आणि त्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत येणाऱ्या समस्या तसेच पेन्शन, केंद्र सरकारच्या 5 टक्के कोठ्यात निवृत्त सैनिकांना सामावून घ्यावे ,इतर राज्यात माजी सैनिकांना घरफाळा पाणीपट्टी माफ आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने माजी सैनिकांना ही सवलत द्यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या आणि सैनिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्याला कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक सेवादल अध्यक्ष एन.एन. पाटील, अॅड योगेश जोशी, काशिनाथ मेटील, बाबुराव कांबळे, दिनकरराव देसाई, बी.जी. पाटील, अशोक माळी, रामचंद्र शिंदे, रघुनाथ भवड, शशिकांत खोत श्रीपती पाटील, संचालक बिद्री कारखाना. बाबासो चौगले, किरणसिंह पाटील, सागर भोगम सरपंच कंळबा, रामचंद्र नांद्रे गुरूजी, माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी आदिची उपस्थित होती.