अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन भूमि अभिलेख विभागाला प्रदान

अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन भूमि अभिलेख विभागाला प्रदान

कोल्हापूर जिल्हयातील भूमि अभिलेख विभागातर्फे होणारे मोजणीचे काम गतिशील व अधिक अचूक होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ९८.४१ लक्ष रुपयांची अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन आज विभागाला प्रदान करण्यात आली.
कोल्हापुरातील भूमि अभिलेख विभागाकरिता एकूण ११ रोव्हर आणि ०६ वाईड फॉरमॅट प्रिंटिंग मशीन (प्लॉटर) खरेदी केली असून यामुळे जिल्ह्यातील मोजणी काम अधिक गतिशील व अचूक होणार आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध करून देणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.
सदर प्रणाली ही GNSS,GPS वर आधारित असल्याने मोजणी अधिक अचूक व कमी कालावधीमध्ये होणार आहे. यासाठी आवशयक CORS स्टेशनची उभारणी जिल्ह्यातील हातकणंगले व आजरा येथे उभारणी करण्यात आले आहेत.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसा सारखे उंच पिकांमध्ये सुद्धा आता मोजणी करणे शक्य होणार आहे. डोंगराळ भागामध्ये इतर मोजणी साधन सामुग्रीच्या आधारे मोजणी करण्यावर मर्यादा येतात पण या नवीन प्रणालीने हे काम सहजरित्या करता येऊ शकते.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. वसंत निकम, सुधाकर पाटील, शशिकांत पाटील, किरण माने, नागेंद्र कांबळे, विनायक कुलकर्णी, सुवर्णा पाटील, स्मिता शहा, सुवर्णा मसणे, पल्लवी उगले, सुनिल लाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email