कोल्हापुरातील दुधाळी मैदानातील छत्रपती संभाजी महाराज नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजचे उदघाटन करण्यात आले.
या शूटिंग रेंज मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज सहज तयार होतील अशी अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंज तयार केली आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला असून ही शूटिंग रेंज वातानुकूलित आणि साऊंडप्रूफ आहे.
या रेंजमध्ये ७२ लाख रूपात खर्चून १५ मॅन्युअल टार्गेट, आणि १० इलेक्ट्रॉनिक टार्गेट्स बसवली आहेत. तसेच लवकरच २० एअर रायफल रेंजवर दाखल करून ३०० खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कै. सखाराम बापू खराडे आणि रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शूटिंग रेंजला शुटिंगची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चांगले नेमबाज निर्माण होतील. तसेच जिल्ह्यातील नेमबाजी खेळाडूंना याचा उपयोग होणार आहे. नेमबाजीच्या माध्यमातून जे आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू निर्माण होतात त्यांना प्रशासकीय सेवेत नोकरी मिळते त्यामुळे या क्रीडा प्रकाराकडे युवक आणि युवतींनी वळणे गरजेचे आहे.
कोल्हापूरला जो शूटिंगला जो इतिहास आहे तो यापुढेही कायम राहील तर खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रसंगी, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅन अँड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे, सचिन चव्हाण, प्रवीण लिमकर यांच्यासह क्रीडाप्रेमी तसेच भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.