अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभरावे नाट्यसंमेलन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभरावे नाट्यसंमेलन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शंभरावे नाट्यसंमेलन दि. २७ मार्चपासून सांगलीमध्ये सुरु होणार असून दि. १४ जून रोजी मुंबई येथे सांगता होणार आहे.

कोल्हापुरात १९८३ नंतर पहिल्यांदाच नाट्य संमेलन होत असल्याने जिल्ह्यातील कलाकार व कलारसिकांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात हे नाट्य संमेलन यश्वस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे.

यामध्ये, दि. ३ एप्रिलला नाट्य दिंडीद्वारे कोल्हापुरातील नाट्यसंमेलनाची सुरवात, दि. ४ एप्रिल रोजी स्थानिक कलाकारांनी नटलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम व दि. ५ एप्रिलला कलारजनी कार्यक्रमांचे आयोजन खासबाग मैदान व केशवराव नाट्यगृह येथे करण्यात आले आहे.

मराठी नाट्यकला परत ग्रामीण भागामध्येसुद्धा पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कागल, जयसिंगपूर, गारगोटी व गडहिंग्लज या ४ शहरांमध्ये नाट्यजागराचे आयोजन केले आहे. तरी, नाट्यसंमेलनाच्या या उत्सवामध्ये आपणही जरूर सहभागी व्हा.

आजच्या या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाहक सतीश लोटके, प्रवक्ते मंगेश कदम, आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, जयश्री नरके, जितेंद्र देशपांडे, शिवकुमार हिरेमठ, सीमा जोशी, मिलिंद अष्टेकर आदी उपस्थित होते.