डॉ. डी वाय पाटील ग्रुप व दै. सकाळ च्या पुढाकाराने “तंदुरुस्त बंदोबस्त” उपक्रमात पोलीस बांधवांचा सत्कार व पानसुपारीचा कार्यक्रम

गणेश उत्सव पासून सामाजिक उत्सवांचा हंगामच सुरु होतो. उत्सव असोत कि आंदोलन, कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी पोलीस बांधव निरंतर पार पडतात. पोलिसांचे कर्तव्य, त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या वर पडणारा शारीरिक व मानसिक ताण विचारात घेता त्यांचे आरोग्य चांगले राहावे या साठी नियमित वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे.

डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्स मध्ये कार्यरत असलेल्या ४५ वर्ष खालील २१०० कर्मचारी व अधिकारी यांच्या सर्वांगीण वैद्यकीय तपासण्या विनाशुल्क करण्यात येणार आहेत.

]