Events

इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी, उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उभारण्यात आली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी गतवर्षीपासून ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य शासनाची वाटचाल सुरु असून शिव विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनमार्फत यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे, रयतेचे सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

 

 

June 6, 2022

शिवराज्याभिषेक दिन

इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी, उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात…
June 15, 2022

नरंदे ता. हातकणंगले येथे थेट पाईपलाईन व २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

कोल्हापूर जिल्ह्यातील नरंदे ता. हातकणंगले येथे जलजीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र शुद्ध पेयजल योजना वारणा नदी ते नरंदे थेट पाईपलाईन व २ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे…
November 1, 2021

वसुबारस

आज दिवाळीचा पहिला दिवस गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आजच्या दिवशी निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असणारे आणि पिकांचे उंदरापासून रक्षण कणारे सर्प, दूध-दुभत्या म्हैस, गाय जनावरांबरोबरच शेतीसाठी उपयुक्‍त…
October 30, 2021

सर्वांग सुंदर कागल

सर्वांग सुंदर कागल साकारण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कागल नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क, अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना आणि शाहू…